पाळधी येथे विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू; दोन जण जखमी

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथे कपासाची गाडी भरत असतांना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणा जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यानं ट्रक्मध्ये कापसाची गाडी भरत असतांना टपावर बसलेले तिघे जण ट्रकवरून खाली उतरत असतांनाविजेच्या तारांचा विजेचा जबर धक्का लागल्याने विशाल बाबुराव श्रीखंडे (वय-२५) रा. माळपिंप्री या मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले तर ज्ञानेश्वर श्रावण काळे व ज्ञानेश्वर सिताराम भजे रा.  माळपिंपरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने  जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसांत कुठेही नोंद करण्यात आलेली नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!