पाळधी येथे मतदोन नोंदणी मोहिमेस प्रारंभ

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी | येथे माझे मतदान माझे अधिकार या अभियानाच्या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी मोहिम जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.

 

माझे मतदान माझे अधिकार या अभियानाअंतर्गत आज पाळधी येथे शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नोंदणी सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी बु. सरपंच प्रकाश पाटील, पाळधी खुर्द सरपंच शरद कोळी,  उपसरपंच चंदन कळमकर, माजी सरपंच अरुण पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, दीपक सावळे, प्रशांत झंवर, धरणगावचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ त्यांच्यासोबत तहसील येथील कर्मचारी पिंटू पाटील आदींची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी नवीन मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की,  मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते यासाठी मतदार नाव नोंदणी जरुरी आहे. यासाठी नवीन मतदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!