पाळधी खुर्द ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त

शेअर करा !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द ग्रामपंचायतची पंचवार्षीक मुदत संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाळधी खुर्द ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडील आदेशान्वये पंचायत समिती धरणगावचे शाखा अभियंता संजय कुमार शर्मा यांची ग्रामपंचायत प्रशासनपदी नेमणूक करण्यात आलेली आहे.

शाखा अभियंता असलेल्या संजय कुमार शर्मा यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार सरपंच पदाला जे अधिकार असतात ते सर्व अधिकार शासनाने प्रदान केले आहे. पाळधी खुर्द ग्रामपंचायत वर प्रशासक नियुक्त झाल्याने कोणती विकासकामे मार्गी लागतात याबाबत ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!