पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला गावकीचा वाद !

ना. गुलाबराव पाटलांनी बांधावर जाऊन रस्ता केला मोकळा

 

 

 

पाळधी, ( ता. धरणगाव )  : प्रतिनिधी ।  गावकीच्या वादात अनेक ठिकाणी रस्ते अडवून धरले जातात. असाच एक प्रकार येथे घडला असता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन हा वाद सोडवत शेतकर्‍यांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

 

पाळधी बुद्रुक येथील शिवारामध्ये विजय पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण पाटील, गुलाब पाटील, बाळासाहेब पाटील, भूषण पाटील व शामराव पाटील या शेतकर्‍यांमध्ये रस्त्यावरून वाद होता. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचण होत होती.

 

संबंधीतांनी याबाबतची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कानावर घातली. यामुळे ना. पाटील यांनी थेट बांधावर जाऊन सर्व शेतकर्‍यांशी ऑन-द-स्पॉट चर्चा केली. परिसरातील शेतकर्‍यांच्या हितासाठी रस्ता मोकळा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. त्यांनी केलेली मध्यस्थी सर्वांना भावली आणि गेल्या कित्येक  दिवसांपासूनची समस्या क्षणार्धात सुटली आणि हा रस्ता मोकळा करण्यात आला.

 

याप्रसंगी, देवीदास पाटील, अशोक आबा पाटील, सतीश पाटील, विजू बापू पाटील, अशोक माळी, दिलीप पाटील, भगवान ठाकरे व बळीराम सपकाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.