पालकमंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा शिक्षक सेनेच्यावतीने अन्नदान

पाचोरा, प्रतिनिधी  ।  जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात जळगाव जिल्हा शिक्षक सेनेतर्फे जळगाव शहरात गरजूंना आज  जेवण वाटप करण्यात आले. 

कोविड महामारीच्या सध्याच्या परिस्थितीत गरजू व निराधार लोकांना आज समाजाकडून मदतीची गरज आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या  वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात रेल्वे स्टेशन परीसरातील १०० गरजू, निराधार जेवण वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र  सपकाळे, जिल्हा सरचिटणीस  नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनील चौधरी, धरणगाव तालुका अध्यक्ष रमेश बोरसे, जळगाव तालुका अध्यक्ष निळू चौधरी, धिरज जावळे, धरणगाव शिक्षक सेना उपाध्यक्ष धनराज वानखेडे सर आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.