पालकमंत्री ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझरचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी वंदनीय  बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्यावतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर  वाटप करण्यात आले. 

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,   खासदार श्रीकांत शिंदे,  मंगेश चिवटे, जितेद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री  ना. गुलाबराव पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कसला सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद व रूग्णसेवक दिपक घ्यार, चेतन परदेशी, अनिल पवार, विशाल निकम, अतुल धनगर आदींची उपस्थिती होती व रूग्णसेवकांचे अनमोल सहकार्य लाभले.

 

या फ्रंटलाईन वर्कर्सच्या मुख्यालयात सॅनिटायझर दिले भेट 

पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस स्टेशन, अँब्यलेन्स चालक व सहकारी, शासकीय महिला रूग्णालय मोहाडी, जळगाव, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव आणि चौका- चौकात बंदोबस्तावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड आदी व शासकीय कार्यालयांत सॅनिटायझरच्या बॉटल्स असलेले बॉक्सचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने सॅनिटायझरच्या बॉटल असलेले बॉक्स भेट देण्यात आले.

 

शासकीय महिला रूग्णालय मोहाडी : कोविडचा प्रादुर्भाव जरी आवाक्यात आलेला असला तरी कोरोना विषाणू ची पुन्हा लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडुन हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.