पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नविन रेशन कार्ड वाटप

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथे नशिराबाद व भागपुर येथील नागरिकांना पालकमंञी ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नविन रेशन कार्ड व १२ अंकी क्रमांक पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

रेशन कार्ड हे सर्व सामान्य नागरिकांना त्याच्या जीवनात अमूल्य व साकारात्म बदल घडवून त्यांना शासनाच्या मार्फत अन्न धान्य माफक दरात मिळवून देण्यासाठी ही मोठी मदत होईल. तसेच ५ लाख रू चा दवाखान्यातील मोफत उपचारासाठी रेशन कार्ड अत्यावश्यक असते. हे रेशन कार्ड वाटपासाठी तहसीलदार नामदेव पाटील, गणेश चव्हाण, सजय अंबुरे यांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम झिअम फाउंडेशन अध्यक्ष प्रदिप साळी व शिवसेना कामगार सेना यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला. पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून नशिराबाद येथील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहेत. यावेळी उपस्थित अरूण भोई, विशाल झोपे, विजय साळी, किशोर खरे, पंकज नाथ, लखन मोची, जगन बारेला, समाधान भोई, राहूल करडे, सुरेश नाथ, सुपडू कुंभार यासह रेशन कार्ड लाभार्थी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!