पारोळ्यात भोई समाज युवा मंच कडून विविध मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन

पारोळा प्रतिनिधी । तालुका भोई समाज युवा मंचच्या वितीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

भोई समाज हा अत्यंत गरीब समाज असुन महाराष्ट्रातील समाजाची लोकसंख्या ४०लाखाच्या जवळपास आहे. समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भोई समाजाला आरक्षण फार गरज आहे. भोई समाजातील ९० टक्के लोक पोटापाण्यासाठी गावोगावी भटकंती करीत असता आणि या समाजाला संविधान तरतूदीनुसार आरक्षणाचा सहारा मिळाल्यास भोई समाजाला न्याय मिळु शकेल. १९७४ भोई समाजाला भटक्या विमुक्त जातीचे तुटपुंजे आरक्षण देण्यात आले, परंतु त्यातही ३५ जातींचा समावेश करण्यात आला भोई समाज वर अन्याय झाला असुन या समाजाला मुख्यप्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे तरी या मागण्या गांभिर्याने व विचार करावा.

प्रमुख मागण्या महाराष्ट्रातील भोई समाजाला अनुसूचित जाती अथवा जमातीच्या एस सी किंवा एस टी च्या सवलती मिळाव्यात तलाव ठेके फक्त भोई समाजालाच देण्यात यावे. महाराष्ट्रातील मत्स्योदयोग विकास मंडळाचे नाव मत्स्योसहार करावे भोई समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय होस्टेलशी सोय पुरवावी आणि सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी फ्रुटपथावर बसुन चणे फुटाणे विकणारे समाज बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे.धरणामुळे डांगरवाडी धारक विस्थापित झाल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन शासनाकडून उदरनिर्वाह करीता भुमीहीन प्रमाणे कमीत कमी एकर सरकारी जमीन द्यावी भोई समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उद्योग व्यवसायात कर्ज व सबसिडीच्या योजना आणाव्यात भोई समाजातील मुलींना १० वी पर्यंत शिक्षणाचा मोफत लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

भोई समाज युवा मंच जिल्हा संघटक प्रमुख जयेश भोई, मयुर भोई, तालुकाध्यक्ष गौरव भोई, सचिव किरण भोई, सचिन भोई, सागर भोई, नंदकिशोर भोई, प्रविण भोई, चेतन भोई, विशाल भोई, विनायक भोई, विशाल भोई, रवि भोई, हिलाल भोई, कोमल पाटील, गणेश बारी, अश्विन चौधरी, योगेश चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.