पारोळा येथे गुरूनानक व बाबा ज्युडियाराम जयंती उत्साहात साजरी

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथे  गुरूनानक देव  व बाबा ज्युडियाराम साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा सिंधी पंचायतच्या वतीने गुरूनानक देव व सिंधी समाजाजे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांची  जयंती गुरूपुरब उत्सव (प्रकाश पर्व) म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  सर्व प्रथम सकाळी औत्तार गल्लीतील समाज मंदिरात गुरूनानक देव व समाजांचे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांच्या प्रतिमांना पंचामृत स्नान करून अभिषेक करण्यात आला.तसेच संपूर्ण जगात सुख समृद्धी व आनंद नांदो अशी प्रार्थना करण्यात आली.  त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या (कार्तिक स्वामी) कार्तिक मासाची पोती व सव्वा महिन्यांपासून सुरू असलेल्या गुरू ग्रंथ साहेब चे वाचन यांचे आज विधीवत मंत्रोच्चारात मंदिरांचे महंत बाबा ज्युडियाराम साहेब यांचे नातु सांई हिरानंदजी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आले. त्यानंतर समाजांच्या वतीने समाजासाठी आम भंडाऱ्याचे  आयोजन करण्यात आले होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content