पारोळा येथील श्री बालाजी मंदिर जिर्णोध्दार सोहळा

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील आराध्य दैवत श्री बालाजी महाराज मंदिर जिर्णोध्दार सोहळा नुकताच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

 

शहरातील आराध्य दैवत प्रति तिरूपती श्री बालाजी मंदिर जिर्णोध्दार माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यासह सपत्नीक सत्यनारायण पुजा करू करण्यात आली. यानंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी ७ ते १० या वेळेत माऊली भजनी मंडळ यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांचे भावीक भक्तांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाना संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी, महाप्रसाद समितीचे उपाध्यक्ष रमेश भागवत, प्रकाश शिंपी, डॉ आनील गुजराती, दिलीप शिरूडकर, विश्वास चौधरी, ॲड. दत्ता महाजन, गुणवंत पाटील, संजय कासार, गोपाल अग्रवाल, प्रवीण दाणेज आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीसाठी श्री बालाजी भक्त व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!