पारोळा प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी छाया दिलीप पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
आज पीठासन अधिकारी तहसीलदार गवांदे व मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षपदी सौ. छाया दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार व अंजली पवार यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक मनीष पाटील , अंजली पाटील, मंगेश तांबे, पी. जी. पाटील, धीरज महाजन, दीपक अनुष्ठान, कैलास चौधरी, गौरव बडगुजर, संजय पाटील, प्रकाश महाजन, भैय्या चौधरी, नवल चौधरी यांची उपस्थिती होती.