पारोळा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पारोळा प्रतिनिधी । पोराळा येथील १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, पारोळा शहरात १६ वर्षी मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आकाश भाऊसाहेबर गायकवाड रा. श्रीरामपूर जि.अहमदनगर याने फूस लावून पळवून नेले. दरम्यान पिडीत मुलगी अल्पवयीन असून पालकांच्या रखवालीतून तिला पळवून नेले आहे. मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आकाश गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!