पारोळा नगरपरिषदेची सुधारीत कर आकारणी रद्द करा- माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेकडून सुधारित चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी भांडवली मुल्यांवर आधारित सर्वेक्षण करून त्यावर हरकती घेण्यात आले. तरी या प्रक्रियेला स्थगिती देवून सुधारित कर आकारणी रद्द करावी अशी मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.

 

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेकडून नवीन सुधारीत भांडवली मूल्यांवरील कर आकारणी लागू करतांना मागील लागू असलेले भाडेमूल्यांवर आधारीत घरपट्टी दर व नवीन आकारणीनुसार येणारी वाढीव घरपट्टी यातील तफावत विचारात घेतली नाही, यातच गेल्या २/३ वर्षांपासून कोवीड महामारीच्या संकटातून जनता सावरत असतांना या वाढीव घरपट्टीच्या बोझा न पेलावणारा असा आहे. प्रचलित भाडेमूल्यावर आकारली जाणारी कर प्रणालीत सदर मालमत्तेच्या मुळात वापरण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या भाडे मूल्यावर मालमत्ता कर आकारला जात होता. पंरतू नवीन सुधारीत भांडवली मूल्या नुसार आकारणी करतांना मालमत्तेचे बखळ क्षेत्रफळ बांधीव क्षेत्रफळ पाकींग, जिने, ओटे, पसेज, व उर्वरित बखळ जागेचे भांडवली मूल्य काढून त्या भांडवली मूल्यांवर सुधारित मालमत्ता कर आकारणी केली जात आहे.

पारोळा नगरपरिषेदेने स्विकारलेली भांडवली मूल्यांवर आधारित आकारणी करतांना शहराची भौगोलिक परिस्थिती देण्यात येणाऱ्या सुख-सुविधा, स्वच्छता व आरोग्य कामी अक्षम्य दिरंगाई असतांना अनियमीत पाणी पुरवठा, कुठल्याही मोठ्या योजना व प्रकल्प नसतांना प्रचलित “भाडेमूल्य” वर आधारित मालमत्ता कर आकारणी रद्द करून “भांडवली” मूल्या नुसार लावण्यात आलेली मालमत्ता कर आकारणी चुकीची व अन्यायकारक आहे.

 

जिल्हयातील ‘अ’वर्ग’ब’ वर्ग नगरपालिकाचाळीसगांव, अमळनेर, भुसावळ, चोपडा, पाचोरा, एरंडोल, मुक्ताईनगर, जामनेर, सारख्या नगरपालिकांनी अद्याप भांडवली मूल्य आकारणी स्विकारलेली नाही व लागू केली नाही, त्यात ‘पारोळा नगरपालिका ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. वास्तविक पाहता या सर्व नगरपालियां विकास व सुख सुविधा अव्वल दर्जाच्या आहेत त्या तुलनेत पारोळा नगरपालिकेकडून नागरिकांसाठी कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. भांडवली मूल्य आकारणी करतांना मालमत्तेचे मूल्यांकन सन २०२२/२३ नुसार सरस्कट आकारणी करण्यात आली आहे. प्रती वर्षी १ टक्के मात्र घसारा मूल्य कमी केले आहे ते देखील चुकीचे व अन्यायकारक आहे. वास्तवीक पाहता मूल्यांकन आकारणी करतांना सदर मालमतचे बांधकाम वर्षानुसार त्या मालमत्त मूल्यांकन आकारणी दर लावले गेले पाहिजे.

भांडवली मूल्यानुसार आकारणी करतांना नेमणूक केलेल्या कोअर प्रोजेक्ट इंजिनियर्स कन्स प्रा. लि. अमरावती संस्था यांनी केलेल्या सर्वेक्षण मध्ये व मोजमापात भरपूर त्रूटी व चुका आहेत. याबाबत नागरिकांनी पारोळा नगरपरिषेदे कडे शेकडो लेखी हकरती नोंदविलेल्या आहेत. तसेच नगर परिषदेकडे कर वसुली कामी पुरेसे मनुष्य बळ असतांना संबंधित एजन्सीस सर्वेक्षण करणे कामी २५ ते ३० लक्ष देणे चुकीचे व नगरपालिका हिताविरूद्ध आहे. भांडवली मूल्य कर आकारणी बाबत न.पा जनरल सभेत  मंजूर करण्यात आला आहे. तरी सदर ठराव लोकहिता विरुद्ध असल्याने  कार्यवाही करून रद्द करण्यात यावेत.

 

त्यानुसार वरील बाबीचा विचार करता सदर प्रकियेस स्थगिती देवून भांडवली मूल्यानुसार केलेली आकारणी रद्द करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी पारोळा नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

याप्रसंगी  दौलतराव पाटील, चंद्रजीत बाविस्कर, शिवाभाऊ पारोचे, अरूण वाणी,  डॉ. चेतन बडगूजर, डॉ. महेश पवार, डॉ. मनिष पाटील, डॉ. गिरीष जोशी, डॉ. पुरूषोत्तम पाटील, जयेश पाठक, राम ऊपरे, रविद्र मराठे, आकाश महाजन, रोशन शहा, रूपेश हजारे, आबा महाजन, देवेंद्र मराठे, गणेश पाटील, ईश्वर पाटील व व्यापारी नागरीक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.