पारोळा प्रतिनिधी ।दिल्ली येथील केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी आंदोलनास पारोळा तालुका कॉंग्रेस कमिटीने पाठींबा दर्शवून हे काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
पंजाब, हरियाणा, यूपी या राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपाप्रणीत केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधात काळे कायदे केले असून त्या कायद्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारी, बेरोजगारी वाढली म्हणून त्या विरोधात लाखोच्या संख्येने त्या कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. शेतकरी हक्कासाठी काही शेतकऱ्यांच्या बलिदान सुद्धा गेला आहे. संबंधित आंदोलनाला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनस्थळी आमदार चिमणराव पाटिल यांनी भेट देऊन धरणे आंदोलनास पाठिंबा जाहिर केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामराव पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, अपंग सेनेचे तालुकाध्यक्ष बन्सीलाल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील शेतकरी कोमल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील सुरेश पवार, योगेश चिंतामण पाटील, आनंदा अशोक अहिरे, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब हिलाल पाटिल, त्र्यंबक महाजन, राहुल पृथ्वीराज पाटील, धनसिंग नरसिंग पाटील, पुंजू नामदेव पाटील, बाबूलाल जयराम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांनी धरणे आंदोलनाला भेट दिली.