पारख नगरात एकाने घेतला गळफास; रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पारख नगरात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने बुधवारी दुपारी राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर रोडवरील चर्चच्या पाठीमागे पारख नगरात राहणारे अनिल उर्फ अनिरूध्द शांताराम भालेराव (वय-४५) मिळेली ती मोलमजूरी करून काम करतात. घरी वडीलांसह राहतात. अविवाहित असल्याने ते चिंतेत होते. यातचे अनिल याला दारू व्यसनाच्या आहारी गेला. दरम्यान, बुधवारी दुपारी ४ वाजता वडील राहत्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपलेले असतांना पाहून अनिलने मागच्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. वडील झोपेतून उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीन रामानंदनगर पोलीस ठाण्याला कळविले. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विनोद शिंदे व हरीष डोईफोडे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.