पाटणा येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू!

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय-२२) ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सणुजा निरजराव फराटे हि विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना हि थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ठाकूर हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!