पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात ट्यूबवेल लावण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत पाळधी येथील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या ज्योती अनिल ठाकूर यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील अनिल गणेशसिंग ठाकूर यांच्याशी २०१९ मध्ये रीतीरीवादानुसार झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती अनिल ठाकूर याने लहान सहान गोष्टींवरून त्रास देणे सुरू केले. त्यानंतर शेतात ट्यूबवेल लावण्यासाठी बाहेरून ५ लाखांची मागणी केली. विवाहितेने माहेरून पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. शिवाय सासु जेठ आणि जेठाणी यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला. हा त्रास सहन झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अनिल गणेशसिंग ठाकूर, सासू सरुबाई गणेशसिंग ठाकूर, जेठ सुवर्णसिंग गणेशसिंग ठाकूर आणि जेठाणी ज्योती सुवर्णसिंग ठाकूर सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content