पाचोऱ्यात हाथरस हत्याकांडाचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध

पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना फासावर लटकवावे, कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मीकी या तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करून तिची जीभ कापून गळा कापून तिला ठार मारण्यात आले. ही भयावह घटना असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. आज देशात बेटी बचाव बेटी पढाव अभियान चालू असतांना देशात अशी घटना घडणे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

यावेळी महिला आघाडी च्या तालुकाप्रमुख मंदा पाटील, शहरप्रमुख उर्मिला शेळके, उपतालुकाप्रमुख सुनंदा महाजन, नगरसेविका मालती हटकर, प्रीती सोनवणे, जया पवार, शितल चनाडे, रत्‍ना पाटील, गीता मोरे, ज्योती सोनवणे, तसेच नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शहराध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक सतीश चेडे, पप्पू राजपूत, जावेद शेख, जितु पेंढारकर, सुनील महाजन, वैभव राजपूत, आण्णा चौधरी, मयूर महाजन, विशाल राजपूत, गोपाल भोई, अन्वर शेख, गणेश देशमुख, विशाल डागोर, भागवत पाटील, दीपक पाटील (जारगाव), नितीन पाटील, विजय भोई व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.