पाचोऱ्यात संत निंरकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर

शेअर करा !

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  येथील संत निरंकारी मंडळ, दिल्ली, शाखा पाचोरा तर्फे प. पु. सतगुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.  

रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १२४ दात्यांनी रक्तदान केले.  या शिबिरामध्ये विशेष करून २० महिलांनी रक्तदान केले. तर १०४ पुरुषांनी रक्तदान केले आहे. हरदेवसिंह महाराज १९८० ते २०१६ पर्यंत निर्णकारी मंडळाचे प्रमुख गुरु होते. दर वर्षी संत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान कार्यक्रमात रक्तदान करण्यासाठी शेकडो भाविक व रक्तदाते पूर्ण श्रध्देने रक्तदान करतात व त्यांना त्वरित प्रमाण पत्र दिले जाते. सतगुरू बाबाजींच्या कथनानुसार “रक्त नालियों में नहीं नाडीयों में बहना चाहिए” या संत वचनाचे पालन म्हणून सर्व भाविक व रक्तदाते या सेवेत सहभागी होतात. यावेळी सुद्धा सर्व जनतेने रक्तदान करून संपूर्ण मानवतेची सेवा केली असून संत निरंकारी मंडळ पाचोरा शाखाचे मुख्य प. पू. महेश वाघ यांनी सांगितले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!