पाचोऱ्यात विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सन्मान

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव भूमीतील सामाजिक, शैक्षणिक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक, तसेच अधिकारी अशा विविध क्षेत्रातील प्रगतशील महिलांचा सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

प्रसंगी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद राज्य उपाध्यक्ष नेहा मालपुरे, जळगाव जिल्हा समन्वयक दर्शन गोसावी उपस्थित होते. जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हा उपक्रम पार पडला. या सन्मान सोहळ्यात महिला वकील संध्या साळुंखे, शैक्षणिक क्षेत्रात माजी मुख्याध्यापिका लतिका वाघ, वैद्यकीय क्षेत्रात तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे, व्यवसाय क्षेत्रात क्रांती पाटील, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिभा कुलकर्णी, कृषी सहाय्यक वैशाली पाटील, कला क्षेत्रातील नवोदित कलाकार संजना देसले व दर्शना खैरनार, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर नगरपालिका प्रियदर्शिनी ठाकूर, महिला पोलीस  कॉन्स्टेबल पंचशीला निकम व शमीना पठाण यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्वांशी संवाद साधून मुलींसाठी प्रेरणादायी अशी चर्चा व मार्गदर्शन सर्वांनी केले.

प्रत्येक कामकाज स्थळी जाऊन कामकाज कळावे आणि या सर्व महिलांना कसे तोंड द्यावे लागते याची जाण आपल्याला असावी व मुलींसाठी एक सक्षमीकरणाच्या दृष्टीने सर्व कार्यस्थळी जाऊन हा उपक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, वकील संघ अध्यक्ष रणजित पाटील व संपूर्ण तालुका संघ सदस्य, भा. रा. यू. प. तालुका अध्यक्ष मयूर मालपुरे, युथ विंग अध्यक्ष लोकेश जैन, उपाध्यक्ष साजन पाटील, शुभम रणदिवे कोषाध्यक्ष रिद्धेश वाघ, सचिव मंदार कासार, कल्पेश पाटील, समन्वयक हर्षल राजपूत, अंजली पाटील यादी सदस्य उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content