पाचोऱ्यात मराठा सेवा संघातर्फे अब्दुल सत्तार यांचा निषेध

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मराठा समाजाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरुन शिवीगाळ करून अपमान केला. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो. मात्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर बोलतात यामुळे पाचोरा येथील मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांचा निषेध करुन तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मुकेश तुपे, गणेश पाटील, किशोर पाटील, मुज्जु बागवान, संतोष महाजन, सचिन पाटील, एस. ए. पाटील, अॅड. मानसिंग सिध्दू, लिलाधर पाटील, पंकज पाटील, संजय पाटील यांच्या सह्या आहेत.

यावेळी मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी “हर हर महादेव” चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडफोड करून चित्रपट बनविल्याने त्याचा निषेध करुन तहसिलदारांना निवेदन सादर केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content