पाचोऱ्यात परराज्यातुन येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट तपासणीस सुरूवात

 

पाचोरा : प्रतिनिधी !   जिल्हाधिकारी यांच्या  आदेशान्वये पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आजपासून रेल्वेने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट केल्याशिवाय शहरात प्रवेश न देण्यासाठी विशेष कॅम्पची सुरूवात करण्यात आली आहे.

 

कॅम्पचे आयोजन पाचोरा तालुका वैद्यकिय अधिकारी  ,  वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय , नगरपरिषद  व रेल्वे प्रशासन यांचे संयुक्त विद्यमानाने  करण्यांत आले आहे. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी  शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी  प्रकाश भोसले, उपस्थित होते. रॅपिड अॅंनटीजन टेस्ट करणेसाठी आरोग्य कर्मचारी श्रीमती भारती पाटील, बनिता जाधव, आकाश ठाकूर उपस्थित होते. त्यांना मदतनीस म्हणून नगरपरिषदेचे कर्मचारी  शामकांत अहीरे, शरीफ खान  उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाचे मनोज सोनवणे, टी. सी.  कृष्णा शर्मा, आर. पी. एफ.  कर्मचारीदेखील उपस्थित होते. आज रोजी १० रेल्वे प्रवाशांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये १ प्रवासी हा पाॅझीटीव्ह आढळून आलेला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.