पाचोऱ्यात क्रांतिसूर्य महाराणा प्रताप” यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवशीय व्याख्यानमाला

पाचोरा, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात विविध ठिकाणी क्रांतिसिंह महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवशीय शिव- प्रताप व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आमदार किशोर पाटील व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्यातर्फे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप” यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शहरातील मानसिंगका काॅर्नरच्या प्रांगणावर दि. ८ मे रोजी रात्री ८ वाजता महाराजा छत्रपती शिवाजी महाराज व दि. ९ मे रोजी रात्री ८ वाजता महाराणा स्वातंत्र्यसुर्य राणा प्रताप ही महान मुल्ये भारतीयांच्या नसानसात पेरली आहेत. त्या दोन्ही महान व्यक्तीमत्वांचे चरित्र कथन बांबरुड बु” येथील शिवचरित्र, प्रताप चरित्र, संतचरित्र निरुपणकार प्राचार्य सुनिल पाटील हे करणार आहेत. या दोन दिवशीय शिव – प्रताप व्याख्यान मालेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा – भडगाव शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!