पाचोऱ्यात उद्या मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक, सद्गुरू प. पु. मोरेदादा चॅरिटेबल हाॅस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आरोग्य दत अंतर्गत शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्रात उद्या दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरात श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर येथील तज्ञ (डाॅक्टर), वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हद्यविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर, काविळ, पोटाचे विकार, अॅनिमिया, संधीवात, मुतखडा, मनोविकार, स्त्रीयांचे आजार, त्वचा रोग, दंत विकार, गर्भाशयाचा कॅन्सर, मुळव्याध, लहान मुलांचे आजार, या सह सर्व जुनाट आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा तालुक्यासह परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र, संघवी काॅलनी, पाचोरा येथील आयोजकांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content