पाचोरा येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील सारोळा रोडवरील स्व. कालिंदीबाई पांडे गतीमंद निवासी विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

 

 

पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आज ३ डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग दिन” विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप करुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील गतीमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, युवासेना शहर संघटक प्रशांत सोनार, युवासेना शेतकरी संघटना प्रमुख गौरव पाटील, जगदिश महाजन, नाजिम बागवान, नदीम शेख, किरण चौधरी, गोकुळ सावंत, स्व. कालिंदीबाई पांडे गतीमंद निवासी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप पांडे, एस. आर. राजगुरु, आबाराव महाजन, चंद्रकांत मराठे, जगदिश पाटील उपस्थित होते.

 

Protected Content