पाचोरा येथे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात रॅली व जेलभरो आंदोलन (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर | केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे शहरातून रॅली काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

 

केंद्र सरकारने जाती आधारित जनगणना तसेच ओ. बी. सी. ची जातनिहाय जनगणना न करण्याचे ठरविले आहे तसेच शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायदे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे यांच्या विरोधात व   खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी तसेच जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागु करण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ.बी.सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आज दि. २५ नोव्हेंबर रोजी शहरातुन रॅली काढून पोलिस स्टेशनला येऊन “जेलभरो” आंदोलन करण्यात आले. शहरातील आठवडे बाजार येथुन गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल होवुन “जेलभरो” आंदोलन करण्यात आले. या “राष्ट्रव्यापी चरणबध्द” रॅली व जेलभरो आंदोलनास शिवसेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या भव्य रॅली व “जेलभरो” आंदोलना प्रसंगी राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका प्रभारी नंदलाल आगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान, नगरसेवक अशोक मोरे, वासुदेव महाजन, रफीक बागवान, बाबुराव सुतार, जाकीर खाटीक, हरिष आदिवाल, संजय महाले, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, माजी नगरसेवक नसीर बागवान, सामाजिक कार्यकर्ते साजीद कुरेशी, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन पैठणकर, मुख्तार शहा, अशोक महाजन, यांचेसह राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जेलभरो आंदोलनकर्त्यांना कलम – ६८ व ६९ नुसार अटक करुन सुटका करण्यात आली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!