पाचोरा येथे उद्या पत्रकार बांधवाची मोफत नेत्र तपासणी

पाचोरा, प्रतिनिधी | रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या तालुक्यातील पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

 

याबाबत वृत्त असे की,  येथील डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या रूग्णसेवेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव,

व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ रोजी रविवारी सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील बी. ए. मराठे कॉम्प्लेक्स येथे तालुक्यातील पत्रकार बांधवांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिना निमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला पाचोरा तालुक्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, वेबपोर्टल सह सर्व माध्यम समूहात कार्यरत पत्रकार बांधव यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

 

या शिबिराला उपस्थिती देतांना चेहर्‍यावर मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, पत्रकार बांधवांनी येतांना आपला जुना चष्मा सोबत आणावा. तसेच या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी घ्यावा असे आवाहन तेजोदीप नेत्रायलाचे संचालक तथा  रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटरी क्लब सचिव रो. डॉ. पंकज शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर रो. शिवाजी शिंदे सह रोटरी क्लब पाचोरा – भडगाव यांचे तर्फे करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!