पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील वेरूळी खु” येथे सरपंचपदी शिवसेनेच्या माजी उपसरपंच भगवान दोधु पाटील यांच्या पत्नी सिमा भगवान पाटील तर उपसरपंचपदी नंदलाल हिंम्मत पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
वेरूळी खु या सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण चार महिला सदस्या आहेत. नुकत्याच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सिमा पाटील तर उपसरपंचपदी नंदलाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिमा पाटील यांना सुचक ईश्वर पाटील तर नंदलाल पाटील यांना सुचक संजय भास्कर भिल हे होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. टी. मोरे यांनी शासकिय नियमानुसार दुपारी दोन वाजता निवड जाहीर केली. त्यावेळी नवनिर्वाचित सदस्या सुशिला दत्तू पाटील, शांताबाई आत्माराम पाटील, छाया योगिराज पाटील, सदस्य ईश्वर महादु पाटील, भिल्ल संजय भास्कर सेनेचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक विकास पाटील, भगवान पाटील, मा. उपसरपंच राजेंद्र पाटील, शंकर पाटील, गोपीचंद पाटील, जितेंद्र पाटील, योगिराज पाटील, आत्माराम पाटील, माजी पो. पाटील रमेश पाटील, देविदास पाटील, दगडू पाटील, गुलाब पाटील, संजय मिस्तरी, आदी ग्रामस्थ, पोलिस पाटील भिमसिंग पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोज माळी, ग्रामसेवक एस. डी. पाटील शिपाई सुरेश पाटील हे उपस्थित होते.