पहूर येथील साक्षी माळीने विज्ञान विषयात पटकविले १०० पैकी ९९ गुण

शेअर करा !

 

पहूर , ता . जामनेर, प्रतिनिधी । येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी कैलास माळी हिने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९४.४० % गुण मिळविले. विज्ञान विषयात पटकविले तिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत.

साक्षी माळी हिने तीने विद्यलयातून विज्ञान विषयात सर्वाधिक म्हणजे १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत. तिच्या या यश बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .साक्षी ही पहूर येथील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक डी. के . माळी यांची नात चित्रपट दिग्दर्शक कैलास माळी यांची मुलगी आहे . तीला शाळेच्या मुख्याध्यापिका शिला मॅडम तसेच विज्ञान शिक्षक प्रमोद सरोदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!