पहूर येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

शेअर करा !

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। गावातील शासकीय विश्रामगृह परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

store advt

याबाबत माहिती अशी की, पहूर पेठ येथील शेतकरी समाधान रामकृष्ण चौधरी यांचा मुलगा राहुल समाधान चौधरी (वय-२०) या तरूणाने आईवडील शेतात गेल्यावर व्हॉटस्ॲपवर ‘गोईंग टू द लॉग जर्नी’ असे स्टेटस ठेवून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मयत राहुल हा नेहमी प्रमाणे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेला होता. त्याला सैन्य दलाल भरती होण्याची तिव्र इच्छा होती. मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच आईवडीलांनी घरी धाव घेतली व मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. हूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून प्रकाश शेनफडू पांढरे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, आजी असा परिवार आहे .

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!