जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांचे सर्व सामान्य नागरीकांशी दबंगिरीने वागणूक देत आहे. पो.नि. धनवडे यांची तीन दिवसात बदली करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे हे पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांशी दबंगगिरीने वागणूक देतात. याचा अनुभव सर्वांनाच आलेला आहे. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी शेंदुर्णी येथील किरकोळ वाद होवून दोन्ही बाजूचे लोक पहूर पोलीस ठाण्यात आले. चर्चा सुरू असतांना पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी शेंदुर्णी येथील युवा सेना शहरप्रमुख अजय भोई यांच्या कानशिलात लगावली, भांडणातील त्रसस्त असतांना व चूक नसतांना कानशिलात मारली. शिस्त, कायदे, नियमांचे धडे सर्वसामान्यांना देवून दबंगीरी करायची व अवैध धंदेवाल्यांना अभय देणाऱ्या पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांची तीन दिवसात बदली करावी अन्यथा २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पहूर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील, युवा सेनेचे राज्य सहसचिव विराज कावडीया, शिवसेना उपतालुका संघटनक सुधाकर सराफ, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ, उपतालुका प्रमुख सुनिल अग्रवाल, शहरप्रमुख संजय सुर्यवंशी, जामनेर शहरप्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, जामनेर उपशहरप्रमुख कैलास माळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड. भरत पवार, मनोज देवकरे, मुकेश जाधव यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/308483854428083