परिवर्तनतर्फे आषाढी एकादशी निमित्त दृकश्राव्य कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन जळगावतर्फे आषाढी एकादशीनिमित्त १ जुलै रोजी परिवर्तन दृकश्राव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रारंभी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

store advt

परिवर्तन जळगावतर्फे उद्या दिनांक १ जुलह रोजी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा कार्यक्रम होणार आहे. या संगीतमय कार्यक्रमाचे दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे तर संकल्पना मंजूषा भिडे यांची आहे. तर निर्मिती नारायण बाविस्कर यांची आहे. यानंतर महाश्‍वेता देवी लिखित कुरुक्षेत्रानंतर, बहिणाबाईंची गाणी व कवितांवरील अरे संसार संसार उदय प्रकाश लिखित वॉरेन हेस्टिंगचा सांडफ, अरुण कोल्हाटकर यांच्या भिजकी वही यांचेही सादरीकरण व प्रसारण करण्यात येणार आहे. कोरोना काळात सर्व नियम व बंधन पाळून व्हिडिओच्या माध्यमातून परिवर्तनचा दृकश्राव्य महोत्सव होत आहे.

error: Content is protected !!