परवानगी नाकारली तरी राहूल गांधी लखीमपूर खेरीला रवाना

लखनऊ वृत्तसंस्था | कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यासाठी परवानगी नाकारली असतांनाही ते आज तेथे जाण्यासाठी रवाना झाले आहे. यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रविवारी लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंसाचार झाल्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना लखीमपूर खेरीमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

या पार्श्‍वभूमिवर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही राहुल गांधी लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!