पत्र्याच्या शेडमधून शेतकऱ्याच्या कापसाची चोरी


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेरी शिवारातील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी ७७ हजार रूपये किंमतीचा कापूस चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट भिका पाटील (वय-६५) रा. शेरी ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेरी गावातील खळ्यात असलेला पत्राच्या शेड मधून अज्ञात चोरट्यांनी ७७ हजार रुपये किंमतीचा कापूस चोरून येण्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात त्यांनी सर्वत्र माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरी झाल्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पोहोचूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडफोन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.


Previous articleअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
Next articleकारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.