जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठ येथील पत्रकार भवनात शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी वक्ते अरूणभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन करण्यात आले. तर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोपी सोरडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.
पत्रकार दिनानिमित पत्रकार भवानात जळगाव जिल्हा पत्रकार संघ व आर एल हॉस्पीटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमात असलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोपी सोरडे, विश्वस्त अशोक भाटीया, ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग महाले, यांच्यासह आदी उपस्थित होते.