पत्रकार जीवन चव्हाण यांचा सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी  । लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी जीवन चव्हाण यांना  समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याने आज भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. 

 

आज सायंकाळी जीवन चव्हाण यांना राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाजातर्फे समाजभूषण पुरस्काराने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना सन्मानित केले.  यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!