पत्नीच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यासह सासू, सासरे, दीर व दीरानी यांना बुधवारी रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे.

पत्नीच्या खून प्रकरणात पती पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे याच्यासह सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश व  दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) या सर्वांना बुधवारी रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. नणंद सरला देशमुख (रा.परभणी) या महिलेला अद्याप अटक झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच सत्र न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्व पर्याय संपल्याने पाचही जण बुधवारी पोलिसांना शरण आले.

आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खून व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!