पतीच्या मित्रानेच केला विवाहितेवर अत्याचार

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील २२ वर्षाच्या विवाहित महिलेवर तिच्या पतीच्या मित्रानेच शारीरीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घाट रोड परिसर याभागात एक व्यक्ती पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. तो व्यक्ती भंगाराचा व्यावसाय करून आपले उदरनिर्वाह करीत असतो. मात्र २९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो भांडी आणण्यासाठी बाहेर गेले असता. त्याचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर (रा. कादरीनगर) याने त्याच्या पत्नीला रात्री ८ वाजेच्या सुमारास फोन करून तुझे अश्‍लीत व्हिडीओ व फोटो माझ्या मोबाईलला असल्याचे सांगत याला डिलीट करायचे असेल तर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील शेतात ये असे धमकावले.

यावर संबंधीत विवाहित महिला रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणी गेली. तेव्हा निजाम शेख जकीरउध्दीन मुजावर याने मोबाईल न दाखवता तिच्यावर अत्याचार केला. तेवढ्यात तिचा पती  दाखल होताच मुजावर हा तेथून पसार झाला. पिडीतेने लागलीच आपल्या पतीसह शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. यानुसार निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक एन. ए. सैय्यद हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.