पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी..

खासदार उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन..

 

चाळीसगाव , प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या आर्थिक उन्नती साठी तसेच अंत्योदयाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून तरुण वंचित घटकांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज चाळीसगाव येथे केले. मोदी फॉर पीएम ऑर्गनायझेशन तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,माजी सरपंच रवीआबा पाटील, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडू पगार, माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अमित सुराणा,कैलास गावडे, अनिल गोत्रे, मुकेश गोसावी, मनोज चौधरी ,यांच्यासह मोदी फॉर पीएम ऑर्गनायझेशन तालुका अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष सर्वेश पिंगळे उपस्थित होते.

यावेळी कल्पेश मालपुरे (उपाध्यक्ष )प्रदीप (पप्पू) राजपूत (वरिष्ठ उपाध्यक्ष) राजेंद्र पाटील (मंत्री) अतुल कैलास पवार (मीडिया प्रभारी) स्वप्नील पाटील (सह मीडिया प्रभारी) गिरीश अहिरे (पीएमओ तालुका मंत्री) कल्पेश देसले (मंत्री ) ,अक्षय राजपूत (पीएमओ तालुका मंत्री) सागर मुंडे महामंत्री, शुभम घोडेस्वार( महामंत्री) बाजीराव आहीरे ( महामंत्री), शिवराज पाटील (उपाध्यक्ष) अनिल गुजर (उपाध्यक्ष) सोनू अहिरे (उपाध्यक्ष) उदयसिंग साळुंके (उपाध्यक्ष) बबडी शेख (उपाध्यक्ष) कपिल रामभाऊ पाटील (वरिष्ठ उपाध्यक्ष) योगेश गव्हाणे ( वरिष्ठ उपाध्यक्ष) गौरव पाटील ( वरिष्ठ ) ज्ञानेश्वर धनराज साबळे (कोषाध्यक्ष )अक्षय मराठे (वरिष्ठ उपाध्यक्ष) गौरव गणेश पुरकर (महामंत्री ) या सर्वांना खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी पप्पू राजपूत मनोगत व्यक्त केले ते म्हणाले कार्यसम्राट खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून तालुक्यात केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आम्ही पदाधिकारी मेहनत घेऊन अशी भावना व्यक्त केली.

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही वाटचाल करणार आहोत अशी भावना तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केले. तालुका उपाध्यक्ष सर्वेश पिंगळे यांनी आभार मानले.

योजना दुत म्हणून काम करा
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या योजना यांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला योजनांची माहिती करून द्यावी. एक सच्चा योजना दुत म्हणून काम करा असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.