देहू-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते देहू दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावरून बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, तुकाराम महाराजांचे शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेने बंद करा पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान मोदी हे गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.
आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.