पंतप्रधानांनी मातेचे दर्शन घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा

गांधीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातोश्री हिराबेन यांचे पाय धुवून दर्शन घेत त्यांना शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मातोश्री हिराबेन यांची आज भेट घेतली. आज त्या वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.

दरम्यान, दुसर्‍या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबेन आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत. हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. पंतप्रधान देखील आज गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ मंदिराला भेट देतील. त्यानंतर वडोदरा येथील एका रॅलीला संबोधित करतील.12:06 PM

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!