पंजाबमध्ये विषारी दारुमुळे मरणाऱ्यांची संख्या ८६ वर पोहचली ; १३ अधिकारी निलंबित

शेअर करा !

चंडीगड (वृत्तसंस्था) पंजाबमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ४६ लोकांचा मृत्यू काल (शनिवार) झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी दारुबंदी विभागातील सात व दोन उपअधीक्षक आणि चार ठाणेप्रमुखांसह पोलीस दलातील सहा, अशा एकूण १३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

store advt

 

पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावटी दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक ६३ मृत्यू तरणतारण जिल्ह्यात तर अमृतसर (ग्रामीण) व गुरदासपूरमध्ये (बटाला) अनुक्रमे १२ व ११ लोकांना विषारी दारुमुळे प्राण गमवले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आणि कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तर माजी उप-मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी काँग्रेस सरकारवर अवैध दारु विक्रीला अभय दिल्याचा आरोप केला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!