जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा कार्यकाल १४ मार्च रोजी संपुष्टात आला. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांचे सभापती यांचेकडील वाहने संबंधित प्रशासनाकडे जमा करण्यात आली.
तर जिल्हास्तरावरील प्रशासकीय वाहने २० मार्च रोजी जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन सूत्रांनी दिली.
जळगाव जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापुर्वी जिल्ह्यातील गण गट रचनेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने फेबृबारीच्या पहिल्या सप्ताहातच राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सदर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून गण-गट रचनेसाठी हालचाली केल्या जात होत्या. परंतु ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक घेण्यात येवू नयेत यासाठी राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या नव्याने काढण्यात येऊन राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या सुधारित अध्यादेशावर मार्चच्या दुसऱ्या सप्ताहात राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १४ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती, सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने राज्य शासन निर्देशानुसार पंचायत समित्यावर गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार १५ पंचायत समित्यांचे सभापतींना देण्यात आलेली शासकीय वाहने १३ मार्च रोजीच सांयकाळी संबंधित प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत.
जि.प. अध्यक्ष विषय सभापतीची वाहने २० मार्चनंतर जमा
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती यांना देण्यात आलेली शासकीय वाहने २० मार्च नंतरच प्रशासनाकडे जमा करण्यात येणार आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.