पंकजा मुंडे व भाजपला बदनाम करणारे आमच्यातलेच ! : बावनकुळे

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच पक्षाला बदनाम करणारे एक युनिट आमच्यातच असल्याची धक्कादायक कबुली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

जालना येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक युनिट आहे. तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तुमच्या रक्तात बेईमानी आहे. बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवले होते. त्यामुळे खरे सत्य काय आहे हे निकाल आला की कळेलच. घटनाबाह्य सरकार उद्धव ठाकरे यांनी बनवले होते. भाजपच्या युती सोबत निवडून आले. एवढीच धमक होती तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवताना आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. निवडून येऊनच सरकार बनवायचे होते, असे बावनकुळे म्हणाले.

Protected Content

%d bloggers like this: