पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जळगावातील कार्यकर्त्यांचे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जळगावातील कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. या अनुषंगाने आज आज लाडवंजारी व ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले.

 

माजी मंत्री पंकज मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवार नाकारली आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी केला. देवेंद्र फडणवीस व चंद्रकात पाटील यांच्या विरोधात आकाशवाणी चौकात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी इश्वर पाटील, गजानन वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, शेखर लाडवंजारी, मयूर नाईक, अभिषेक वाघ, मयूर वाघ व ओबीसी समाज कार्यकर्ते सहभाग घेतला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!