पंकजा मुंडेंना सेनेत प्रवेशाची गुलाबराव पाटलांची ऑफर

गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कौटुंबिक नात्याचा संदर्भ

शेअर करा !

 

जळगाव : प्रतिनिधी । गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कौटुंबिक नात्याचा संदर्भ देत आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडेंना सेनेत प्रवेशाची ऑफर दिली .

यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि , गोपीनाथ मुंडे गेल्यावर युती असताना आणि नसतानाही शिवसेनेने प्रितमाताईंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता गोपीनाथ मुंडे युतीसाठी पुढाकार घेणारांपैकी एक होते त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे एक कौटुंबिक नाते होते ते नाते शिवसेनेने सांभाळले यामुळे मला असं वाटत की आता नाथाभाऊ तिकडे गेलेत तसे पंकजाताईंनी सेनेत यावे

दुसऱ्या एक प्रश्नाच्या उत्तरात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की नाथाभाऊ आता महाविकास आघाडीत आल्याने त्यांनी आता मोठं मन दाखवावं आणि हातात हात घालून काम करावं मीही मंत्रिपदाचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही , माणसं जोडून त्यांना जपणं महत्वाचं , गरज पडेल तिथे निश्चित रागवावे पण शांततेने सगळे झाले तर नक्कीच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!