न्हाईचा प्रताप : वेबसाईटवर आमदार ऐवजी पराभूत उमेदवाराचे नाव : छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संकेत स्थळवर जळगावच्या आमदारांचे नाव प्रसिद्ध न करता पराभूत उमेदवाराचे नाव प्रसिद्ध होत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी तसेच राष्ट्रीय महामार्गावर सुरु असलेले कामांंमुळे नागरिकांना होणारा  त्रास कमी करण्याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार छावा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा वंदना भगवान पाटील यांनी न्हाईला निवेदनाद्वारे दिला आहे.

 

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संकेत स्थळवर जळगाव शहराचे स्थानिक आमदार सुरेश दामू भोळे( राजूमामा) यांचे नाव नसून सदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असे गुगलवर शोध घेतल्यास त्या पानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अभिषेक पाटील  यांचे नाव दाखवत आहे.   आ. राजूमामा भोळे हे  जळगाव शहरातून दोन वेळा  निवडून आले असून आज पावेतो आपण याची मात्र न्हाईने याची दखल घेतली नाही. तरी आपण याबाबत सदर विभागास सूचना देवून योग्य ती कार्यवाही करावी आणि योग्य तो त्या ठिकाणी बदल करावा अन्यथा आमचे संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा वंदना भगवान पाटील यांनी निवेदनाद्वारे  दिला आहे.

 

पूर्वी असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सुरु असलेले बांभोरी ते तरसोद जळगाव शहरातून जाणारे महामार्ग विस्तारी करणाचे काम आपण नेमून दिलेलेया ठेकेदार हा काम योग्य पद्धीतेने करत नसून त्यांच्या आणि आपल्या विभागाचे अधिकारी यांचे कडून होणारे चुका मुळे नागरिकांना त्रासास वारंवार सामोरे जावे लागत आहे.सदर कामा ठिकाणी काम सुरु असलेले ठिकाणी फलक नाहीत,तसेच साईड पट्टे वर लेवल नाही,ज्या ठिकाणी काम झाले तेथून महामार्गावर चढणेस लेवल केले नाही त्या मुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत परवा दि.२७/०९/२०२१ रोजी असाच बांभोरी  पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. तरी  सदर ठेकेदार व अधिकारी यांना या बाबत सूचना देवून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आमचे संघटनेकडून ज्या ठिकाणी अशा प्रकारे कामात अनियमता दिसेल तेथेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर  भारती राजपूत, पूनम खैरनार, नाना महाले, किशोर पाटील, केतन पाटील, जयश्री पाटील आदींची स्वाक्षरी आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!