नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाहीत : उदय सामंत

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) विद्यापीठाच्या अंतिम वर्षासह अन्य परिक्षांबाबत राज्यातील १३ कुलगुरुंशी बोलल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी १७ मे रोजी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. आता सप्टेंबर नाही तर नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाहीत, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

store advt

 

 

राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करुनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील सर्व कुलगुरुंनी परीक्षा घेण्यासाठी नकार दिला आहे. परीक्षा न घेण्यासंदर्भात त्यांनी आपली मतं मांडली. राज्यातील १३ कुलगुरु या बैठकीला उपास्थित होते. कुलगुरुंनी आपली भूमिका ठाम राखण्यासाठी चार तारखेला पुन्हा बैठक झाली. या बैठकीत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कद्वारे पास करावे असे मतं मांडले. तसेच ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना पर्याय ठेवावा, असे सांगितले. त्यानुसार तो पास होत नसल्यास त्याला कोव्हिडच्या परिस्थितीमुळे ग्रेस गुण पद्धत अवलंबावी आणि त्याची एटीकेटी सोडवावी हा देखील मार्ग काढण्यात आला होता,असेही सामंत यांनी सांगितले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!