नेहरू युवा केंद्र, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे नागरिकांची तपासणी !

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशन व नेहरू युवा केंद्रातर्फे शनीपेठ परिसरात घरोघर जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी नागरिकांना आर्सेनिक अल्बम औषधींचे वाटप करण्यात आले.

store advt

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच आहेत. नेहरू युवा केंद्र आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशनमार्फत शनीपेठ परिसरात शनिवारी नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक कुटुंबासाठी आर्सेनिक अल्बम औषधींचे मोफत वितरण देखील यावेळी करण्यात आले. नागरिकांची स्क्रिनिंग करण्याचा उपक्रम नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, सल्लागार प्रभाकर महाले, विजय देवरे, गौरव चौधरी, नितीन वाणी, श्रीकांत चौधरी, हर्षल चौधरी, जितेंद्र माळी, पवन चौधरी, चेतन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!