नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे वृक्षारोपण

स्वच्छ भारतची घेतली प्रतिज्ञा : महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त द्रौपदीनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव कार्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छ भारतची शपथ घेतली. सूत्रसंचालन प्रशांत बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तर कार्यक्रमासाठी युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, शाहरुख पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

परिसरात केले वृक्षारोपण
नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नेहरू युवा केंद्रातर्फे दि.२ ऑक्टोबर रोजी द्रौपदी नगर परिसरात वृक्षारोपण केले. प्रत्येक स्वयंसेवकाने यावर्षी १० रोपांची जबाबदारी स्वीकारून ती जगवावी अशी सर्वांनी शपथ घेतली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.